Posts

राज ठाकरे जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार, महाराजांची भूमिका कोण साकारणार?

Image
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जागतिक स्तरावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केलेली. याबाबत राज ठाकरे यांना अमोल कोल्हे यांनी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न विचारला. मुंबई :    ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनोखी मुलाखत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी  राज ठाकरे  यांना त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट बनवला तर कुणाला मुख्य भूमिकेत साकारताना पाहायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. बायोपिकसाठी त्या प्रकारचं व्यक्तीमत्व लागतं. माझ्या मते या देशात बायोपिक करता येऊ शकेल असं इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता दिदी यांच्यावर बायोपिक करता येईल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपण चित्रपट बनवत असल्याचं म्ह...